मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद

टीम अॅग्रोवन

सातारा  ः मराठा आरक्षणाची मागणी, काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सरकारचा निषेध म्हणून सातारा जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सातारा येथे महामार्ग रोको तर कराड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. वाई, दहिवडी, कोरेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यात आजपासून (बुधवारी)आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद मंगळवारी जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पाळल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. वाहनांनी नेहमी गजबलेला असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मात्र तुरळक वाहतूक सुरू होती. साताऱ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. या पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मल्हारपेठ येथे मल्हारपेठ व्यापारी असोसिएशनने संपूर्ण बंदची हाक दिल्याने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शाळा, कॉलेज अंगणवाडी, वडाप व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. कराड येथे मराठा क्रांती मोर्चाने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी दत्त चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. एक मराठा - लाख मराठा या घोषणेने परिसर दणाणून गेला. वाई येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारचा निषेध म्हणून वाई येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाने निषेध फेरी काढली. तसेच वाई येथे उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

साखरवाडी व दहिवडी येथे मोर्चा काढून बंद पाळण्यात आला. तसेच  सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. दरम्यान सातारा येथे झालेल्या बैठकीत बुधवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता राजवाड्यापासून मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नेऊन तेथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री सातारा येथे शिवशाही बसवर दगड फेक करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT