मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा

टीम अॅग्रोवन

पुणे  ः मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत रविवारी (ता. २९) पुण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने युवक सहभागी झाले होते. त्यामुळे बहुतांशी भागात वाहतूक बंद होती.

सकाळी अकरा वाजता मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. डेक्कन जिमखान्याजवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला महिला आंदोलकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिजाऊ वंदना गाऊन मोर्चाला सुरवात झाली. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. मोर्चाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यात मराठा आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, यासाठी निषेध रॅली काढण्यात आली होती.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास ९ आॅगस्टला क्रांतीदिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज (ता. ३०) सोलापूर बंदची हाक दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT