मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

लातूर येथे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

टीम अॅग्रोवन

लातूर  ः पालकमंत्री व राज्य शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर बुधवारी (ता.१) ठिय्या आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. या वेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून चाल केली. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या समस्यांची जाण असेल, तर श्री. निलंगेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच घरासमोर घंटानादही करण्यात आला.

बुधवारी (ता. १) पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या येथील एलआयसी कॉलनीतील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. बुधवारी सकाळपासूनच श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वसंतराव नाईक चौकापासून घोषणा देत कार्यकर्ते श्री. निलंगेकर यांच्या घराकडे निघाले होते. पालकमंत्र्यांच्या घराकडे हे कार्यकर्ते जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी दूर रस्त्यावर बॅरिकेट लावले होते. तेथेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. यात कार्यकर्ते व पोलिस एकमेकांशी भिडले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नमते घेतले. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT