किसान क्रांतीतर्फे आंदोलनास प्रारंभ
किसान क्रांतीतर्फे आंदोलनास प्रारंभ 
मुख्य बातम्या

किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा येथून प्रारंभ 

टीम अॅग्रोवन

पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान क्रांतीच्या आंदोलनाला मंगळवारी (ता. १५) पुणतांबा (जि. नगर) येथून मशाल पेटवून सुरवात झाली. २६ जानेवारीपासून मशाल यात्रेला सुरवात होणार असून, १९ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर यात्रेचा समारोप होईल. याच वेळी सरकारला अल्टिमेटम दिला जाणार आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेते धनंजय जाधव यांनी दिली. आंदोलन प्रारंभावेळी राज्यभरातून शेतकरी नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

राज्यातील शेतकरी संपाला गेल्या वर्षी पुणतांबा येथून सुरवात झाली होती. त्यानंतर संपाचा वणवा राज्यभर पेटला. त्या वेळी सरकारने आश्‍वासने दिली; पण त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला पुणतांबा येथूनच सुरवात होत आहे. त्याच अनुषंगाने मंगळवारी चांगदेव महाराज मंदिर परिसरात राज्यभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांची बैठक झाली.

जाधव यांच्यासह सुहास वहाडणे, सतीश कानवडे, जयाजी सूर्यवंशी, किरण सुराळकर, योगेश रायते, सतीश पाठक, लक्ष्मण वनगे, एस. बी. पाटील, राजाभाऊ देशमुख, बी. जी. पाटील, विजय काकडे, श्रीकांत तराळ, प्रदीप बिनवडे, चंद्रकांत वाटेकर, गणेस बनकर, संभाजी गमे, माजी सरपंच सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव या वेळी उपस्थित होते. या वेळी किसान क्रांती आंदोलनातर्फे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे पुणतांबा परिसरातील रामपुरवाडी येथील आत्महत्या केलेल्या कै. सोमनाथ म्हसे यांच्या पत्नीच्या हस्ते अनावरण करण्यात आले व मशाल पेटवली गेली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT