मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घट
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घट 
मुख्य बातम्या

मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घट

टीम अॅग्रोवन

सोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले, मात्र गतवर्षीच्या तुलनेत सप्टेंबरपर्यंत ८३० कोटींची घट झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ११ लाख ८७ हजार दस्त नोंदणीतून १४ हजार कोटी मिळाले असून, मागच्या वर्षी याच कालावधीत १५ हजार १३० कोटींपर्यंत वसूल झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.  जमिनी, खुली जागा खरेदी-विक्री, घर खरेदी-विक्रीसह ६३ प्रकारच्या व्यवहारांमधून महसूल विभागाला दरवर्षी सरासरी २१ ते २६ हजार कोटींपर्यंत मुद्रांक शुल्क मिळतो. २०१६-१७ मध्ये २१ हजार कोटी तर २०१७-१८ मध्ये २६ हजार ५३४ कोटींचे मुद्रांक शुल्क मिळाले. नोटाबंदीनंतर त्यामध्ये थोडीशी घट झाली, तरीही मागील वर्षी एकूण उद्दिष्टापैकी ११९ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा मात्र, महसूल विभागाने २७ हजार कोटींचे उद्दिष्ट देऊनही अद्याप ५० टक्‍केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.  जागतिक मंदी अन्‌ बॅंकांसमोरील अडचणींमुळे जागा, जमिनी, घर विक्रीत घट झाली असून जीएसटीमधील हजारो कोटींची घट आणि आता मुद्रांक शुल्कातील घट, यामुळे आगामी काळात सरकारच्या महसुलात मोठी घट होईल, अशीही शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून मुद्रांक शुल्क घटल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुद्रांक शुल्क कमी होण्याच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्याची स्थिती... मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट : २७,००० कोटी सप्टेंबरपर्यंत वसुली : १४,००० कोटी सहा महिन्यांतील उद्दिष्ट : १३,६०० कोटी मागील वर्षीच्या तुलनेतील घट : ८०० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT