‘Use home-grown soybean seeds in kharif’
‘Use home-grown soybean seeds in kharif’ 
मुख्य बातम्या

‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’

टीम अॅग्रोवन

सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे  घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार असल्याचे मत  कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले.

 नागठाणे येथे सोयाबीन बियाणे अंकुरण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक प्रसंगी बोलत होते. या वेळी प्रगतशील  शेतकरी सुनील नारायण साळुंखे, राम साळुंखे उपस्थित होते.

 सोनावले म्हणाले, ‘‘सध्या सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी स्वतःसाठी सुद्धा बियाणे न ठेवता संपूर्ण सोयाबीनची बाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे आज तत्कालीन फायदा दिसत असला तरी खरीप हंगामात त्याचा तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. 

खुल्या बाजारात  सोयाबीनची विक्रमी दर वाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.  काही वेळेस चांगले बियाणे मिळणे कठीण होऊ शकते. खरीप हंगामातील अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी मिळेल ते बियाणे घेऊन पेरणी करतात आणि त्याचा उगवण क्षमता व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. 

ज्यांच्याकडे फुले संगम, फुले किमया, डी एस -२२८, फुले अग्रणी,  जे एस ३३५ या वाणाचे चांगले प्रतीचे सोयाबीन आहे. ’’

शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा

या वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, युवराज काटे, रोहिदास तिटकारे यांच्या मार्गदर्शनातून  उन्हाळी हंगामातील सोयाबीनची जी  प्रात्यक्षिके  घेतली आहेत. त्याची काढणी झाल्यानंतर एक आठवड्यांनंतर या पद्धतीने अंकुरण क्षमता तपासणी करून योग्य ते सोयाबीन बियाणे म्हणून शेतकरी गट, कंपनीमार्फत  विकल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT