‘Shetkari Sanman’ benefits 4.5 lakh account holders in Nanded district
‘Shetkari Sanman’ benefits 4.5 lakh account holders in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात ‘शेतकरी सन्मान’चा साडेचार लाख खातेदारांना लाभ

टीम अॅग्रोवन

नांदेड : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ७५८ शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. अद्यापही सहा हजार ७९२ खात्यांतील नावात  आधार नुसार दुरुस्ती करण्याचे काम शिल्लक आहेत.  निधीमेचे हप्‍ते सुरळित चालू राहण्‍यासाठी शेतकऱ्यांनी त्‍यांचे पोर्टलवरील नाव हे आधार कार्डवरील नावाप्रमाणे आहे का, ते जवळच्‍या सेतु सुविधा, सीएससी केंद्रात तपासावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले. 

शेतकऱ्यांना निश्‍चित उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी पंतप्रधान किसान सन्‍मान निधी योजना सुरु करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील चार लाख ४६ हजार ७५८ पात्र लाभार्थी शेतकरी कुटूंबाची माहिती अपलोड करण्‍याचे काम पूर्ण झाले आहे. लाभा‍र्थी कुटूंबाची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्‍मान निधी रक्‍कम हप्‍तेनिहाय मिळाली. ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टलवरील नोंदणी ही आधार कार्डवरील नावाप्रमाणे नसेल, त्‍यांचे पुढील हप्‍ते थांबविण्‍यात येतील. त्‍यामुळे पुढील हप्‍ते नियमित चालू राहण्‍यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डवरील नावाप्रमाणे पीएम किसान पोर्टलवर आपल्या नावात सुधारणा करावी.

स्वतः करा नावात दुरुस्ती

शेतकरी स्‍वतः देखील आधारप्रमाणे नावात सुधारणा करू शकतील. यासाठी त्‍यांनी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवरील उजव्‍या बाजूला Farmers Corner येथे क्लिक केल्‍यावर येणाऱ्या विविध पर्यायांपैकी Edit Adhar Failure Record यावर क्लिक करावे. आलेल्‍या स्क्रिनवर Aadhaar नंबर टाकावा ज्‍यानुसार  शेतकऱ्यांचे यापुर्वीचे नोंदविलेले नाव व इतर माहिती दिसेल. या नावापुढे असलेल्‍या रिकाम्‍या जागी शेतकऱ्यांनी आपल्‍या आधार कार्डवर असल्‍यानुसार तंतोतंत नाव टाईप करुन अपडेट बटनवर क्लिक करावे. याप्रमाणे वैयक्तिक स्‍तरावर दुरुस्‍तीचा पर्यायही उपलब्‍ध करुन दिला आहे.

‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे पैसे अडचणीच्या काळात मिळत आहेत. त्यामुळे खूप मोठा आधार मिळत आहे. - संतोष दंडे, शेतकरी, मालेगाव, ता. अर्धापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT