‘Kukadi’ on water issue Let's find a solution: Pawar 
मुख्य बातम्या

‘कुकडी’ पाणीप्रश्‍नावर तोडगा काढू : पवार

नगर :नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्‍न सोडविण्यासंदर्भात नव्या पिढीने आग्रह धरला आहे. या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेऊन विस्तृत चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत तिसरी बैठक घेणार असून, तीन आठवड्यात ‘कुकडी’च्या पाणीप्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

नगर :  नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्‍न सोडविण्यासंदर्भात नव्या पिढीने आग्रह धरला आहे. या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेऊन विस्तृत चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत तिसरी बैठक घेणार असून, तीन आठवड्यात ‘कुकडी’च्या पाणीप्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. 

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी आलेले शरद पवार कुकडी पाणीप्रश्‍नावर म्हणाले, की नगर जिल्ह्यातील कुकडीच्या पाणीप्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह सर्वच नव्या पिढीने आग्रह धरला आहे. कुकडी पाणीप्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी यापूर्वी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये या कुकडी प्रकल्प समूहातील अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर विस्तृत चर्चा झाली आहे. 

येत्या पंधरा दिवसांत जलसंपदा विभागाची पुन्हा एकदा बैठक घेऊन तीन आठवड्यात या कुकडीच्या पाणीप्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत. ञञजलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, की कुकडी पाणीप्रश्‍न जटील आहे. या पाणीप्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही खा. शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत आहोत. त्यांच्या उपस्थितीत तब्बल दोन-दोन तासांच्या दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये अडचणी व उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली असून, पुन्हा एकदा बैठक घेऊन मार्ग काढणार आहोत. या भागातील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडवून या भागाला अधिकाधिक पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT