‘Infected Poultry Farmers Will be compensated '
‘Infected Poultry Farmers Will be compensated ' 
मुख्य बातम्या

‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई मिळणार’

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी) येथील एका कुक्कुटपालन फार्मवरील ८४३ कोंबड्या मृत्यमुखी पडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी (ता. १३) पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने मुरुंबा शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या कुक्कुटपालन फार्मवरील ३ हजार ४४३ कोंबड्यांना शास्त्रोक्त पद्धतीने दयामरण (कलिंग) देऊन विल्हेवाट लावली. कुक्कुटपालक शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मावेजा अदा केला जाईल,’’ अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अशोक लोणे यांनी दिली.

‘बर्ड फ्लू’ चा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुरुंबा तसेच गावाच्या पाच किलोमीटर परिघातील कोबंड्याच्या वाहतूक, विक्री खरेदीच्या व्यवहारास प्रतिबंध घातला होता. औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एस. जे. गायकवाड हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

मुरुंबा येथील बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरात कुक्कुट पक्षांना दयामरण देऊन शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आठ शीघ्र कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. 

बाधित क्षेत्रातील पक्षांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दुसऱ्या प्रक्षेत्रावर जाऊ नये, प्रक्षेत्रावर वावरताना मास्क, सॅनिटायझर, गमबुट, हँडग्लोज व चष्मा वापरून वैयक्तिक सुरक्षेचे पालन करावे. तरी जिल्ह्यामध्ये स्थलांतरित पक्षी, कावळे, कुक्कुट वर्गीय पक्ष्यांमध्ये असाधारण मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास (०२४५२) २२०३८८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. लोणे  यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT