‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजारांची मदत द्या’  ‘To the over-flooded farmers Help 50,000 per hectare '
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजारांची मदत द्या’  ‘To the over-flooded farmers Help 50,000 per hectare ' 
मुख्य बातम्या

‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजारांची मदत द्या’ : स्वाभिमानी शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. पिके वाहून गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या. सोयाबीनच्या मध्य हंगामी पीकविमा परताव्यासाठी सर्व ५२ मंडळांचा समावेश करावा आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मंगळवारी (ता.२१) परभणी, जलालपूर (ता. परभणी), गंगाखेड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  जुलै, सप्टेंबर महिन्यांतील अतिवृष्टी, तसेच ऑगस्ट महिन्यातील पावसाचा दीर्घ खंड यामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ आर्थिक मदत करावी. पीकविमा भरपाई मंजूर करावी. साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह देण्यात यावी. स्थानिक आपत्ती नुकसानअंतर्गत ७२ तासांच्या आत तक्रार देण्याची अट रद्द करावी आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिंगबर पवार, शेख जाफर, मुंजाभाऊ लोडे, रामप्रसाद गमे, भास्कर खटिंग, केशव आरमळ, बाळासाहेब घाटोळ, प्रसाद गरुड, रामभाऊ आवरगंड, माउली लोडे, विकास भोपाळे आदींसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT