२५ Pay 25% advance amount of crop insurance in Beed district 
मुख्य बातम्या

`बीड जिल्ह्यात पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम द्या`

बीड : जिल्ह्यात सर्व ठिकाणी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत संभाव्य नुकसानीच्या सरासरीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी पीक विमा कंपनीला दिले.

टीम अॅग्रोवन

बीड : जिल्ह्यात सर्व ठिकाणी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या विमा धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत संभाव्य नुकसानीच्या सरासरीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी पीक विमा कंपनीला दिले. 

जिल्ह्यात जुलै महिन्यात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने महिनाभर दडी मारली. त्यामुळे उडीद व मूग तर पूर्ण: हातचे गेले. पण, सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले. 

जिल्हाधिकारी यांच्या या आदेशानुसार, जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, परळी, केज, बीड, शिरूर कासार, वडवणी, धारूर या तालुक्यातील सर्वेक्षण झालेल्या सर्व महसुली मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कम मिळेल. अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात मुख्यत्वे सोयाबीन पिकाचे फेर सर्वेक्षण करून त्या दोन तालुक्यांची स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात तब्बल ५९ महसूली मंडळात सोयाबीन पिकाचे ५० टक्के, मुगाचे २८ मंडळांत, तर उडदाचे १५ मंडळांत नुकसान झाले. बीड जिल्ह्यात तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. मात्र, पावसाने पेरणीनंतर काही दिवसांनी उघडीप दिली. त्यामुळे उडीद व मूग पीक पूर्णतः: हातचे गेले. तर, सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले.

या मंडळांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

मूग : पाटोदा, अंमळनेर, दासखेड, थेरला, कुसळंब, आष्टी, कडा, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, दादेगाव, दैठणा, आष्टा (हरिनायण), गेवराई, उमापूर, रेवकी, धोंडराई, मादळमोही, पाचेगाव, जातेगाव, तलवाडा, चकलांबा, पाडळशिंगी, कोळगाव, माटेगाव, सिरसदेवी.

उडीद : पाटोदा, अंमळनेर, दासखेड, थेरला, कुसळंब, आष्टी, कडा, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, दादेगाव, दैठणा, आष्टा (हरिनायण).

सोयाबीन :  पाटोदा, अंमळनेर, दासखेड, थेरला, कुसळंब, आष्टी, कडा, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, दादेगाव, दैठणा, आष्टा (हरिनायण), बीड, नाळवंडी, पाली, म्हाळसजवळा, मांजरसुंभा, चौसाळा, पेंडगाव, नेकनूर, पिंपळनेर, राजूरी नवगण, लिंबागणेश, कुर्ला, घाटसावळी, पारगाव (सि), चऱ्हाटा, येळंबघाट, परळी, नागापूर, पिंपळगाव (गाढे), मोहा, सिरसाळा, धर्मापूरी, वडवणी, चिंचवण, कवडगाव, शिरुर कासार, गोमळवाडा, ब्रम्हणनाथ येळंब, खालापूरी, रायमोहा, तिंतरवणी, केज, विडा, युसूफवडगाव, पिंप्री, होळ, बनसारोळा, नांदूरघाट, चिंचोलीमाळी, मस्साजोग, धारूर, मोहखेड, तेलगाव, अंजनडोह.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT