मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 
मुख्य बातम्या

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

टीम अॅग्रोवन

मुंबई : अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. ७) मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या तरुणाला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश शेटे हा तरुण नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने कृषी सेवक पदाची परीक्षा दिली होती. यापूर्वी तो कृषी आयुक्तालय, पुणे येथे तसेच मंत्रालयातील कृषी विभागात पाठपुरावा करीत होता. बुधवारी तो पुन्हा मंत्रालयात आला होता. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, तसेच कृषी विभागात नोकरीचे पुढे काही होत नसल्याचे पाहून हताश झालेल्या शेटे याने मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंतर त्याची मंत्रालयातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून देण्यात आली.  पंधरा दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आठ दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. तर गेल्याच आठवड्यामध्ये आणखी एका तरुणाला कीटकनाशकासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शेतकऱ्यांनंतर सुशिक्षित बेरोजगार तरुणही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देऊन पायऊतार व्हावे. - अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT