येवला तालुक्यात चाऱ्यांचे भाव कडाडले, पशुपालक धास्तावले
येवला तालुक्यात चाऱ्यांचे भाव कडाडले, पशुपालक धास्तावले 
मुख्य बातम्या

येवला तालुक्यात चाऱ्यांचे भाव कडाडले, पशुपालक धास्तावले

टीम अॅग्रोवन

नाशिक : येवला तालुक्यात उन्हाळ्यात असलेली दुष्काळी गंभीर परिस्थिती भर पावसाळ्यात अजूनच गंभीर होत चालली आहे. काही भागांमध्ये पाऊस पडला, थोड्याफार प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ असाच असून पशुपालकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. जो चारा एकपट भावाने मिळत होता, आता त्याचे दर दुप्पट झाल्याने पशुपालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने गायरानावर चराईसाठी गवत नाही. दुष्काळ असल्याने पीकचारा मुबलक उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जानेवारी महिन्यातच संपुष्टात आला. त्यामुळे दावणीला असलेलं पशुधन जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बाजरी, कडबा, मक्याचा चारा, भूस या प्रकारचा चारा संपल्याने पर्यायी म्हणून ऊस विकत घेतला जात आहे. मात्र, टनाला ५ हजार रुपये मोजावे लागतात असल्याने पशुपालक धास्तावले आहेत. सध्या हे दर ४५०० रुपयांपर्यंत आले आहेत. जनावरे जगविण्यासाठी मागील वर्षांपासून चारा विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उसनवारी व सोने-नाणे गहाण ठेवून चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. चाऱ्याच्या दरात टनामागे १००० ते १५०० रुपये अधिक मोजावे लागत आहे. 

उसाला मनमानी भाव   निफाड तालुक्यातील ऊस व बांडीचे व्यापारी ट्रक, पिकअपमध्ये ऊस भरून थेट विक्रीसाठी घेऊन येतात. ऊस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळी ७ वाजेपासून झुंबड उडते. मनमानी भाव द्यावा लागत आहे. सध्या ४५०० ते ४७०० रु. असा दर आहे.

ग्रामीण भागात चाऱ्याची परिस्थिती खूपच अवघड झालेली आहे. साठवलेला चारा संपला, आता सर्व पावसावर अवलंबून असून, पशुधन टिकविण्यासाठी मोठी तारांबळ उडते आहे. - विजय लोखंडे, पशुपालक, अंदरसूल, ता. येवला

अजून एक महिना हिरवा चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे दुभती जनावरे सांभाळण्यासाठी दुसरा चारा उपलब्ध नसल्याने ऊस जरी परवडत नसला, तरी विकतचा ऊस विकत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  - अतुल खैरनार, पशुपालक, गारखेडे, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT