वर्ध्यात यंदा कापसाची  १९ लाख क्‍विंटलची खरेदी This year in Wardha, cotton Purchase of 19 lakh quintals
वर्ध्यात यंदा कापसाची  १९ लाख क्‍विंटलची खरेदी This year in Wardha, cotton Purchase of 19 lakh quintals 
मुख्य बातम्या

वर्ध्यात यंदा कापसाची १९ लाख क्‍विंटलची खरेदी 

टीम अॅग्रोवन

वर्धा : कापूस लागवड क्षेत्र सर्वाधिक असलेल्या वर्धा जिल्ह्याची कापूस उत्पादकता हब, अशी ओळख आहे. याच जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख २१ हजार ८४७ शेतकऱ्यांकडून तब्बल १९.४० लाख क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. कापूस खरेदीबाबत पणन महासंघ तसेच सीसीआयकडून तळ्यात-मळ्यात होत असताना जिल्ह्यात खुल्या बाजारात कापूस खरेदी वाढली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जिल्ह्यात ६५ हजार ३०३ शेतकऱ्यांनी सीसीआय व पणन महासंघाला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ९४६ शेतकऱ्यांकडून ९८ हजार ४६०.२ क्‍विंटल कापूस पणन महासंघाने सात केंद्रावरून खरेदी केला. त्या सोबतच २९ हजार ५९५ शेतकऱ्यांचा ६ लाख ६ हजार ८११.४ क्‍विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला. सीसीआयची जिल्ह्यात ३१ केंद्र होती.

परंतु खुल्या बाजारात कापसाच्या दरात तेजी असल्याने पणन महासंघ व सीसीआयच्या केंद्रांवरील आवक मंदावली. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांकडून टप्याटप्याने खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची सद्यःस्थितीत सारी भिस्त खुल्या बाजारावर उरली आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या ७१ केंद्रांवरून ८७ हजार ३०६ शेतकऱ्यांचा १२ ला ३५ हजार ४८३.५६ क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. एकूणच फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण १०९ केंद्रांवरून १ लाख २१ हजार ८४७ शेतकऱ्यांचा १९ लाख ४० हजार ७५५.१६ क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.  अशी आहे खरेदी (क्‍विंटलमध्ये) 

  • पणन ः ९८,४६०.२ 
  • सीसीआय ः ६,०६,८११.४ 
  • व्यापारी ः १२,३५,४८३.५६ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT