यंदा काजू २५, आंब्याचे १५ टक्केच उत्पादन
यंदा काजू २५, आंब्याचे १५ टक्केच उत्पादन 
मुख्य बातम्या

यंदा काजू २५, आंब्याचे १५ टक्केच उत्पादन

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील काजू आणि आंबा या दोन्ही प्रमुख पिकांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. या वर्षी काजूचे २५, तर आंब्याचे १५ टक्के उत्पादन येईल. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार असून, शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचा ठराव बुधवारी (ता. ११) झालेल्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला सदस्य रणजित देसाई, अनुप्रिती खोचरे, वर्षा पवार, महेंद्र चव्हाण, अमरसेन सांवत, सुधीर नकाशे, गणेश राणे, प्रीतेश राऊळ, कृषी अधिकारी विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.

क्यार वादळामुळे नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडला. त्यानंतर जिल्ह्यातील वातावरणात सातत्याने बदल दिसून आले. यावर्षी जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिले. या वातावरणामुळे आंबा, काजूमुळे कीड रोगाचे प्रमाण वाढले. या दोन्ही पिकांचा हंगाम लांबला आहे. त्याचाही फटका उत्पन्नावर होत आहे. एकूणच यावर्षी काजू उत्पादन २५ टक्केवर येणार आहे. तर आंबा उत्पादन फक्त १५ टक्के येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होणार  आहे. या शेतकऱ्यांना दिलास देणे आवश्‍यक आहे. शासनाने आंबा, काजू पिकांच्या घटलेल्या उत्पादनाच्या अनुषंगाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.

जिल्ह्यातील ३९ मंडळ कार्यालयामध्ये स्कायमीक कंपनीची स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत. ही केंद्रे अत्याधुनिक असून त्यांची नोंद विमा कंपनीला आपोआप मिळते. एखाद्या हवामान केंद्राची माहिती मिळाली नाही तर विमा कंपनीचा प्रतिनिधी तेथे जाऊन तत्काळ दुरुस्ती करीत असतो. त्यामुळे हवामान खात्याच्या केंद्रामध्ये कोणताही दोष नाही, अशी माहिती कृषी विभागाचे अरुण नातू यांनी दिली. या वेळी समिती सदस्य श्री. म्हापसेकर यांनी प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारण्यात यावी, अशी सूचना केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT