Yavatmal ZP also leads Mahavikas Aghadi
Yavatmal ZP also leads Mahavikas Aghadi 
मुख्य बातम्या

यवतमाळ झेडपीतही महाविकास आघाडी

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः राज्यात अस्तित्वात आलेला सत्तेचा महाविकास आघाडीचा फार्म्युला जिल्हा परिषदेतही प्रत्यक्षात येणार असल्याची शक्‍यता बळावली आहे. शनिवारी (ता. ११) या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार असून त्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाआघाडीची सत्ता तीन पक्ष मिळून स्थापन करणार आहेत. तीनही पक्षांच्या नेत्यांनी त्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्तेचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यानुसार वीस सदस्य असलेल्या शिवसेनेने जिल्हा परिषद अध्यक्ष पदासोबतच दोन सभापती पदांवर दावा सांगितला आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अपक्षांसह १२ जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र, अधिक जागा असतानाही उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता आहे. या माध्यमातून बंगल्याला खुश करण्याचा प्रयत्न होईल, असेही राजकीय जाणकार सांगतात. दोन सभापती पदे काँग्रेसला दिली जाऊ शकतात. एका सभापतिपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. 

जास्त जागांचा दाखला देत काँग्रेसकडूनही उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. रख्मिणी उकंडे आणि कालिंदा पवार यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व शक्‍यतांवर शनिवारी (ता. ११) महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब होणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाविकास आघाडीची स्थापना या ठिकाणी केली जाईल, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT