वराड येथे कापूस कार्यशाळा
वराड येथे कापूस कार्यशाळा 
मुख्य बातम्या

अधिक दरासाठी एकत्र येऊन कापूस विक्री करा ः डागा

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः शेतकऱ्यांनी एकी केली पाहिजे. एकीला पूरक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची योजना सरकार राबवित आहे. एकत्र येऊन बियाणे, निविष्ठा मागविल्यास कमी दरात, थेट शेतापर्यंत त्या मिळू शकतील. शेतमालाची किंवा कापसाची एकत्र येऊन विक्री करायचे ठरविले, तर दरही अधिक पदरात पाडता येतील, असे मत कॉटनगुरूचे संचालक तथा मार्केटिंग सल्लागार मनीष डागा यांनी व्यक्त केले. 

वराड (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथील रामजी जिनिंग प्रेसिंग कारखान्यात बुधवारी (ता. २७) कापूस उत्पादक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डागा बोलत होते. यशस्वी कापूस उत्पादक अमृतराव देशमुख, एमसीएक्‍सचे वरिष्ठ व्यवस्थापक बद्रूद्दीन खान, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे संचालक अविनाश काबरा आदी या वेळी उपस्थित होते. एमसीएक्‍स, कॉटनगुरू व रामजी जिनिंग यांच्यातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  

बद्रूद्दीन खान म्हणाले, की देशात कापूस उत्पादन कमी झाले आहे. जागतिक स्तरावर कापसाचे उत्पादन कमी असून, पुढेही दर टिकून राहतील.  कापूस उत्पादक अमृत देशमुख म्हणाले, की रासायनिक खतांचा जादा वापर जळगाव जिल्ह्यात केला जातो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविले पाहिजे. कापूस पिकाचे व्यवस्थापन पूर्व मशागतीपासून काटेकोरपणे केले पाहिजे. वाणांची निवड, लागवड, सिंचन याबाबत व्यवस्थित कार्यवाही करावी. फूल व पाते गळ किंचित असली तर उत्पादन वाढते, पण त्यासाठी जमीन सुपीक, सेंद्रिय कर्बयुक्त हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT