अकोला जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यशाळा
अकोला जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यशाळा 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यशाळा

टीम अॅग्रोवन

अकोला  ः जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात येथे संबंधित संस्थांचे व्यवस्थापक, गटसचिव, प्रतिनिधी यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांनी संस्थांच्या उपविधीनुसार निवडणुका घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे, मुख्य लिपिक वाय. पी. लोटे यांनी निवडणुकीबाबतच्या तरतुदी व करावयाच्या कार्यवाही, तसेच या वेळी प्राप्त प्रश्नांचे शंका निरसन केले. संस्थांच्या उपविधीनुसार पाच वर्षांत एका वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती, संस्थेच्या व्यवहार व उपविधीनुसार दिलेली पात्रता धारण करणारा व थकीत नसलेला सभासद हा मतदार होऊ शकतो, असेही या वेळी सांगण्यात आले. निवडणुकीकरिता संस्थांनी आवश्यक असलेली ई-१, ई-२, ई-३ या नमुन्यातील माहिती व निवडणूक निधी हा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रारूप मतदार यादीच्या सहा प्रती मुदत संपण्याच्या १२० दिवस अगोदर जिल्हा किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे आहे. याबाबतही सूचना देण्यात आली. क्रियाशील सभासदांच्या तरतुदी या निवडणुकीत लागू होत असल्याने संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता मतदार यादी तयार करताना अक्रियाशील यांचा समावेश मतदार यादीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, त्यानुसार २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत सर्व संस्थांनी सूचनांप्रमाणे मुदतीत कार्यवाही करावी व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT