Working with ‘Pushpasanshodhan’ for Flower Value Addition: Gard 
मुख्य बातम्या

फुलांच्या मूल्यवर्धनासाठी ‘पुष्पसंशोधन’सोबत काम : गरड

पुणे ः ‘‘फुलांच्या मूल्यवर्धनासाठी त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्मितीसाठी पुणे बाजार समिती आणि पुष्पसंशोधन संचालनालय एकत्रित काम करणार आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘फुलांच्या मूल्यवर्धनासाठी त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्मितीसाठी पुणे बाजार समिती आणि पुष्पसंशोधन संचालनालय एकत्रित काम करणार आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. 

संचालनालयाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मांजरी येथील संशोधन प्रक्षेत्राला भेट देऊन गरड यांनी संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. 

गरड म्हणाले,‘‘ पुणे जिल्हा फुले उत्पादनासाठीचा क्लस्टर म्हणून विकसित होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालयातर्फे विविध संशोधन प्रकल्प सुरु आहेत. हे संशोधन थेट बांधावर पोचविण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. यासाठी डॉ. प्रसाद यांचे मार्गदर्शन घेणार आहे.’’ 

‘‘सध्या व्यापारीच फुलांचा प्रकार, वाण, रंग विक्रीसाठी निश्चित करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विशिष्ट जातीचीच फुले व विशिष्ट रंगाचीच फुले उत्पादित करावी लागतात. परिणामी फुलांच्या अनेक वाण आणि रंगांचे पर्याय असताना फुलांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांना मर्यादा आहेत. व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे’’, असे प्रसाद यांनी सांगितले.

पुष्पसंशोधन संचालनालयाने शेवंती आणि गुलछडीचे विविध वाण विकसित केली आहेत. आता पुणे, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या केंद्रातून वाण उपलब्ध होतील. ही फुले बाजारात आल्यावर नक्कीच ग्राहकांना आवडतील आणि दर पण चांगले मिळतील.  - अप्पा गायकवाड, अध्यक्ष, फुले बाजार अडते व व्यापारी संघ.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season Aid: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजारांची मदत जाहीर

Maharashtra Farmer Relief : दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; लिंबुची आवक कमीच, संत्र्याला उठाव, ज्वारीचे दर दबावात तर गवारचा भाव तेजीतच

Rabi Sowing : यंदा रब्बीच्या क्षेत्रात होणार वाढ

Soil Testing: मातीपरीक्षणातून रब्बीसाठी खतांचे करा नियोजन

SCROLL FOR NEXT