samurudhi
samurudhi 
मुख्य बातम्या

समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरु 

टीम अॅग्रोवन

मुंबई: टाळेबंदीच्या काळात मुंबईसह राज्यातील काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाचाही समावेश आहे. टाळेबंदीच्या घोषणेनंतर १० एप्रिलपासून समृद्धीच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे टाळेबंदी आणि सामाजिक अंतर रांगत यावर तब्बल १७ हजार ५०० मजूर काम करत आहेत.  मुंबई ते नागपूर प्रवास वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, प्रकल्पाला जोरदार विरोध झाला आणि आजही विरोध होत आहे. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम कुठेही थांबलेले नाही. अगदी टाळेबंदीतही काम सुरु आहे.  जनता कर्फ्यू लागल्यानंतर अर्थात २२ मार्चपासून हे काम बंद होते. त्यामुळे एकीकडे मोठे आर्थिक नुकसान होत होते. तर, दुसरीकडे १७ हजार ५०० मजूर बसून होते. हे मजूर एकार्थाने विलगीकरणातच होते. ज्या १६ कन्स्ट्रक्शन पॅकेजमध्ये काम सुरु आहे. त्यातील २ ते ३ पॅकेज वगळले तर इतर सर्व ठिकाणे ग्रीन झोनमध्ये लोकवस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे या कामांना परवानगी देण्याची मागणी एमआरडीसीकडून प्रत्येक पॅकेजमधील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली होती.  ही मागणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाली आणि १० एप्रिलपासून कामाला सुरुवात झाल्याची माहिती एमएसआरडीसी सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. १७ हजार ५०० मजुरांची योग्य ती काळजी घेत काम सुरु आहे. तर, मुंबई-ठाणे-पालघरमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने काम संथगतीने सुरु असून इतरत्र ठिकाणी कामाने वेग पकडला आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात भराव टाकणे, रस्त्याची कामे आणि पुलाच्या कामाचा समावेश आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. तर, कामाचा वेग येत्या काळात वाढवत प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT