manrega
manrega 
मुख्य बातम्या

सांगली : मनरेगाची कामे २० एप्रिलनंतर सुरू करा

टीम अॅग्रोवन

सांगली ःमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे २० एप्रिलनंतर सुरू करा, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घ्या, कामावर आलेल्या मजुरांना सॅनिटायझर, मास्क, साबण पुरवण्याबाबत ग्रामपंचायतींना सुचना द्या, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.  मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. तानाजी लोखंडे यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. गावस्तरावर ‘मनरेगा’ची कामे सुरू करण्याबाबत निर्देश दिले.  गावात दवंडी देऊन नमुना नंबर चार मध्ये मागणी घ्यावी. वैयक्तिक कामावर (घरकुल, विहीर, शोषखड्डे...) जास्तीत जास्त भर द्यावा. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखावे. मजुरांना सॅनिटायझर, साबण, मास्क आदी साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर राहणार आहे. जिल्ह्यात शेतमजूर, ऊस तोडणी कामगार यांना कामे पुरवायची आहेत. साधारणपणे ३० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना प्राधान्याने काम द्यावे. सुरूवातील अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक काम सुरू करण्याची दक्षता घ्यावी. ग्राम रोजगार सेवकांची देयके तत्काळ सादर करावीत, अशा सुचना दिल्या. तालुकानिहाय सेल्फवर असलेल्या कामांची माहितीही राऊत यांनी घेतली.  मनरेगाची कडेगाव तालुक्यात २५६, मिरज ५६६, आटपाडी ५६३, तासगाव २२४, कवठेमहांकाळ तालुक्यात ११० कामे अपूर्ण आहेत. अपुर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी सुचनाही राऊत यांनी केली. मजुरांना तपासणीसाठी कामाच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT