mask
mask 
मुख्य बातम्या

राज्यात बचतगटाच्या महिलांकडून वीस लाख मास्कची निर्मिती 

टीम अॅग्रोवन

लातूरः कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना करीत राज्यातील बचतगटाच्या महिला या आपत्तीचे सोनं करु पाहत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी लागणाऱ्या मास्कची गरज लक्षात घेवून ते तयार करण्याचे शिवधनुष्य या महिलांनी उचलले आहे. पहिल्या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सुमारे तीन हजार बचतगटाच्या महिलांनी वीस लाख ४१ हजार मास्क तयार करून विकले आहेत. यातून दोन कोटी ३६ लाख रुपयांचा व्यवहार केला आहे. यातून साडे दहा हजार महिलांना घरात बसून रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांचे हे मोठे यश आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधवा असे आवाहन केले जात आहे. यातून मास्कची मोठी मागणी वाढत आहे. लोकांची गरज लक्षात घेवून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचतगटाना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यातून राज्यातील दोन हजार ९६५ बचतगट पुढे आले असून त्यांनी मास्क तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या कामातून घरात बसून राज्यातील दहा हजार ६६० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हे आपत्तीच्या काळातील सर्वात मोठे यश आहे.  या सर्व बचतगटांनी आतापर्यंत वीस लाख ४१ हजार ९६० मास्क तयार केले आहेत. या मास्कच्या विक्रीतून या बचतगटांनी दोन कोटी ३६ लाख ८२ हजार ४३१ रुपयांचा व्यवहार केला आहे. सरासरी दहा ते पंधरा रुपयांना या मास्कची विक्री करण्यात आली आहे.   

प्रतिक्रिया निलंगा तालुक्यातील पंधरा वीस गावातील बचतगट मास्क तयार करण्याचे काम करीत आहेत. कर्नाटकमधूनही आमच्या मास्कला मागणी आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या बचतगटाकडून ६५ हजार मास्क कर्नाटकात गेले आहेत. मुंबईहूनही मागणी आहे. घरात बसून महिलांना हा रोजगार उपलब्ध झाला आहे.  - भाग्यश्री मुगळे, सदस्य, शिवपार्वती महिला बचतगट, हलगरा, ता. निलंगा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT