शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवू : कृषिमंत्री भुसे
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवू : कृषिमंत्री भुसे 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवू : कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन

नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. खते, बियाण्यांचा काळाबाजार, साठवणूक आणि शेतकऱ्यांची अडवणूक कोणाकडूनही होणार नाही. मात्र, असे झाल्याचे उघड झाले तर या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा कृतीतूनच दाखवून देईन. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा, इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिला.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२८) खरीप आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेख कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार निलेश लंके, आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थित होती.

कृषिमंत्री भुसे म्हणाले,‘‘कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असले तरी शेतीच्या कामांना सूट दिली होती. खरिपात कोणाचाही अडवणूक होणार नाही याबाबत जिल्हा अधीक्षकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे अशा काळात प्रत्येकाने सेवाधर्म म्हणून काम केले पाहिजे. अशा परिस्थिती कोणी अडवणूक होणार नाहीच, पण कोणी चढ्या दराने बियाणे, खताची विक्री करत असेल, कोणी साठवणूक केली असेल किंवा शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण करत असेल तर आम्ही बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवून देणार आहोत. खते, बियाणे कमी पडणार नाहीत याचे नियोजन केले आहे. सारं काही आलबेल..! नगर जिल्ह्यात खरिपात मोठे क्षेत्र असते. मात्र कृषी विभागाकडून पाहिजे तसे नियोजन केले जात नाही. मंत्री, अधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी मात्र कागदे रंगवून दिशाभूल करत असल्याचा अनेक वेळचा अनुभव याही बैठकीत आला. बांधावर खते, बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. अधिकारी-कर्मचारी थेट बांधावर जाऊन माहिती देत असल्याची माहिती सांगत योजना, अनुदानाबाबत मंत्र्यांनी माहिती देत कृषी विभागात सारं काही आलबेल असल्याचे बैठकीत दाखवून दिले. विशेष म्हणजे किती शेतकऱ्यांनी बांधावर खते, बियाणे मागितले याचा साधारण आकडाही कृषीच्या अधिकाऱ्यांकडे नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT