वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव : चंद्रकांत पाटील Will oppose if power outage: Chandrakant Patil
वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव : चंद्रकांत पाटील Will oppose if power outage: Chandrakant Patil 
मुख्य बातम्या

वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा  : नागरिकांना शासनाने दिलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात भाजपच्या वतीने बिलाची होळी करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. भाजपच्या शहर व जिल्हा शाखेतर्फे त्यांचे आयोजन केले होते. या वेळी वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारने वीज बिलातून सवलत द्यावी. वीज कनेक्शन तोडण्यास आलेल्यांना घेराव घातला जाईल, अशा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिला.  येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वाढीव वीज बिलाची होळी करून आंदोलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी वाढीव वीजबिलांची होळी करून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील त्याची भूमिका स्पष्ट केली.   प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले माजी खासदार राजू शेट्टी, तुमचे चुलत बंधू राज ठाकरे वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करीत आहे. मग भाजपने आंदोलन केले की, ते राजकीय कसे, वाढीव बिलातून लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने वीज कंपनीला पैसे देणे गरजेचे आहे, मात्र ते देत नाहीत. तेव्हा भाजप सरकारला या निमित्ताने इशारा देत आहे की, वीज कनेक्शन तोडण्यासाठी लोक आले तर त्यांना घेराव घातला जाईल. त्यांना वीज कनेक्शन तोडून दिले जाणार नाही. सरकारने १०० युनिट कमी करून देतो म्हणाले होते. तेही दिले नाही. अकरा महिन्यांत प्रत्येक विषयात महाविकास आघाडीने गोंधळ घातला आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT