ranbhajya
ranbhajya  
मुख्य बातम्या

कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्व

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्त्व आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक तरुणांना असणे गरजेचे आहे. पर्यटकांना रानभाज्या आणि त्याचे औषधी गुणधर्म ज्ञात होण्यासाठी त्यासंदर्भातील साहित्य वेंगुर्ला फळसंशोधन केंद्रात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत यांनी येथे व्यक्त केले. डॉ. बाळकृष्ण गावडे आणि डॉ. निलेश कोदे यांनी लिहिलेल्या रानभाज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन स्नेहसिंधु कृषी पदवीधर शिक्षक संस्थेच्यावतीने आयोजीत करण्यात आले होते. झुम ॲपच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला दापोली कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, राज्य मराठी विकास संस्थेचे संजय पाटील, विभागीय सहसंचालक विकास पाटील, स्नेहसिंधुचे हेमंत सावंत, संदीप राणे, व्ही.के.सावंत, डॉ.संजय माने, यासह कृषिक्षेत्रातील विविध तज्ज्ञ उपस्थित होते. कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले, की कोकणातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहेत. परंतु त्याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे ही माहिती स्थानिक तरुणांना असणे आवश्यक आहे. कृषी पर्यटनासाठी रानभाज्यांचा प्रसार होणे आवश्यक आहे. पर्यटकांना या भागात कुठे आणि कोणत्या रानभाज्या मिळतात याची माहिती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय पर्यटकांना रानभाज्यांचे पदार्थही उपलब्ध होणे गरजेचे आहेत. त्यासाठी वेंगर्ले संशोधन केंद्रात लवकरच त्यासंदर्भातील साहित्य ठेवण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून रानभाज्यांची शास्त्रीय माहिती आणि शिजविण्याची पांरपरिक पद्धत त्याचे औषधी गुणधर्म माहिती होणार आहेत. डॉ. संजय भावे म्हणाले, की आदिवासी लोकांचे संपूर्ण जीवनच रानभाज्यांवर अवलंबून आहे. औषध, अन्न आणि जगण्याचे साधनच रानभाज्या आहेत. आपल्या नेहमीच्या जगण्यात रानभाज्यांना खूप मोठे स्थान आहे. या भाज्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून स्नेहसिंधुने पुढाकार घेऊन मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणालगत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन ठिकाणी रानभाज्यांचे डेमोस्टेशन करावे. विभागीय सहसंचालक विकास पाटील यांनी ‘‘रानभाज्यांचे आहारातील महत्व, औषधी गुणधर्म हे लोकांना समजणे गरजेचे आहे. रानभाज्यांच्या बियाण्यांची बँक निर्माण करता येते का? याचा विचार सुध्दा व्हावा’’, असे त्यांनी स्पष्ट केले.

संकेतस्थळावरही मिळणार रानभाज्यांची माहिती रानभाज्यांचे पुस्तक प्रकाशीत करण्यासाठी राज्य मराठी विकास परिषदेने सहकार्य केले आहे. परंतु सध्याचे युग हे संगणकीय इंटरनेटचे आहे. त्यामुळे रानभाज्यांचे हे पुस्तक मराठी भाषा परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया रानभाज्या या पुस्तकात एकुण ३५० रानभाज्यांचा समावेश आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी उच्चारण, स्थानिक नाव, संस्कृत नाव, त्या वनस्पतीच्या फुलांचे, फळाचे फोटो आणि वर्णन, पौष्टिक घटक टिकून राहण्यासाठी पारंपरिक पाककृती याची मांडणी केलेली आहे.  - डॉ. बाळकृष्ण गावडे, लेखक, रानभाज्या पुस्तक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT