नगर जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव
नगर जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात उसासह अन्य पिकांवरही ‘हुमणी’चा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

नगर  ः सर्वच ठिकाणी ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र आता केवळ उसातच नाही, तर खरिपातील अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. असे असताना हुमणी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासह अन्य बाबीत कृषी विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. हुमणीवर उपाययोजना करण्याबाबतच्या मार्गदशर्न कार्यशाळा केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांश भागात यंदा पुरेसा पाऊस नाही. आता परतीचा पाऊस निघून गेल्याने यापुढे खात्रीशीर पावसाची शाश्वती नाही. मुळात सुरवातीपासूनच पुरेसा पाऊस नसल्याने पाणीसाठवण झालेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदा गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून त्याची चाहुल लागली आहे. यंदा पाऊस नसल्याने व सातत्याने जास्त काळ पावसात खंड पडल्याने उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात ऊस हुमणीने बाधित झाला आहे. मात्र हुमणीचा प्रादुर्भाव केवळ ऊसावरच नाही तर कांदा, सोयाबीन, तुर, भुईमूग, बाजरी या पिकांवरही झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने दुष्काळी भाग असलेल्या पाथर्डी, नगर, जामखेड, पारनेर, शेवगाव व नगर लागून असलेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्‍यात उसाशिवाय अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव असल्याचे शेतकरी सांगतात. आधीच पाऊस नसल्याने खरिपाची पिके साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात वाया गेली आहेत. रब्बीची पेरणी रखडली आहे.

अशा परिस्थितीत अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हुमणीचा उसावर प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारण दीड महिन्यापूर्वी कृषी विभागाने आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असून सर्व उपाय सांगत आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही अनेक गावांत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकलेच नसून कृषी विभागाचे हुमणीबाबतचे मार्गदर्शन केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उसाशिवाय अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची कृषी विभागाला माहिती नाही. नेमके किती क्षेत्र बाधित नगर जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. यंदा पाऊस नसल्याने उसाची लागवड फारशी झालेली नाही. मात्र उसासह अन्य पिकांचे नेमके किती क्षेत्र हुमणीमुळे बाधित झाले याचा आकडा कृषी विभागाकडे नाही. हुमणीने बाधित झालेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT