तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे? 
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे?  
मुख्य बातम्या

तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे? 

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपिंग ऑईल, कार्बोनेट आणि बेदाणा भरण्यासाठी लागणारे बॉक्स उपलब्ध होत नसल्याने तयार झालेला बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न बेदाणा उत्पादक आणि बेदाणा शेड मालकांना पडला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहे. यंदाच्या हंगामात सुमारे अडीच ते ३ हजार बेदाणा शेड सुरू झाले आहेत. प्रत्येक बेदाणा शेडवर अंदाजे २५० चे ३०० टन बेदाणा तयार केला जातो. गेल्या पंधरा दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक उद्योग बंद झाले आहेत. त्याचा फटका बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेड मालकांना देखील बसला आहे. 

राज्यात संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपिंग ऑईल, कार्बोनेट यासह अन्य साहित्य मिळत नसल्याने द्राक्ष रॅकवर पडून आहेत. सध्या बेदाणा तयार करणाऱ्यांकडे साहित्य असले तरी ते काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे डिपिंग ऑईल, कार्बोनेट मिळाले नाही तर बेदाणा तयार होणार नाही. 

सध्या हजारो टन बेदाणा तयार झाला आहे. तो बेदाणा कशात साठवणूक करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॉक्स तयार करण्याच्या कंपन्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे बॉक्स कुठेही उपलब्ध होत नाही. बेदाणा बॉक्स विना तसा पडून आहे. जिल्हा प्रशानाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

अडवणूक थांबली मागील दोन दिवसांपासून बेदाणा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची पोलिसांकडून अडवणूक केली जात होती. परंतू आम्ही जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा याखाली नोंदणी केली आहे. त्यामुळे बेदाणा वाहतूक अडवली जात नाही.

बेदाणा ठेवण्यासाठी बॉक्स मिळत नाहीत. त्यामुळे बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न पडला आहे. शासनाने बॉक्स तयार करणाऱ्या कंपन्या सुरू करुन आम्हाला बॉक्स उपलब्ध करुन द्यावेत. - सुनील माळी, बेदाणा उत्पादक आणि शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT