कांदा
कांदा  
मुख्य बातम्या

अतिरिक्त उत्पादनाचा तिढा सुटणार कसा?

ज्ञानेश उगले

नाशिक : एप्रिल, मे महिन्यात चाळीत साठवलेला कांदा जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत बाजारात येतो. त्यानंतर नव्याने काढणी झालेला खरीप व लेट खरीप कांदाच बाजारात राहतो. यंदाच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मात्र चाळींमध्ये ४० टक्के कांदा शिल्लक असून, हा कांदा अजून दीड महिन्यापर्यंत राहणार आहे. मागील पन्नास वर्षांच्या कांदा व्यापारातील अनुभवात यंदा प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांदा शिल्लक असल्याचे दिसत असल्याचे नाशिक जिल्हा कांदा-बटाटा व्यापारी  असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.  

आवक वाढली; गणित बिघडले मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग या तीन राज्यांत वर्षभर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी (उन्हाळ) कांदा लागवडीतही ही राज्ये यंदा सर्वांत पुढे असल्याचे ‘एनएचआरडीएफ''च्या माहितीतूनही स्पष्ट झाले आहे. मे, जून या महिन्यात काही काळ कांद्याचे दर क्विंटलला सरासरी १ हजाराच्या दरम्यान पोहोचले होते. येत्या काळात अजून दर वाढतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला नाही. दरम्यान, सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात दराने उसळी घेतली. तत्काळ देशभरातील इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत गदारोळ सुरू झाला. त्यानंतर कांद्याचे दर खाली उतरले. लाल कांद्याच्या आगमनानंतर व्यापाऱ्यांनी उन्हाळ कांद्याऐवजी लाल कांद्याला प्राधान्य दिले. त्याचाही फटका उन्हाळ कांद्याला बसला. याच काळात साठवणुकीतील कांद्याचे नुकसान होत असतांना शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली. परिणामी, या कांद्याच्या दरात मोठीच उतरण सुरू झाली. जी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरूच आहे. कांद्याच्या बाजाराची सद्याची स्थिती अजून महिनाभर तरी अशीच राहणार असल्याचे कांदा निर्यातदार व व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. या कांद्याला १४० रुपये क्विंटलपर्यंतचा नीचांकी दर मिळत आहे. त्यावरून बाजारात क्षोभ उसळला आहे. रास्ता रोकोसह कांदा रस्त्यावर ओतणे, कांदा विकून मिळालेल्या पैशांची मनिऑर्डर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना करणे यांसारखे आंदोलनांचे पर्याय अवलंबले जात आहेत. यातून कांदा उत्पादक शासनाच्या धोरणाविरोधातील रोष व्यक्त करीत आहेत. ‘हॉर्टिकल्चर ट्रेन’ सुरू करा शेतमाल बाजाराची देशांतर्गत बाजारात होणारी वाहतूक जलद व सुरक्षित होण्यासाठी शासनाने ‘हॉर्टिकल्चर ट्रेन’ची संकल्पना आणली होती. केळी, कांदा, द्राक्षे यांसाठी प्रायोगिकतत्त्वावर चाचपणीही झाली होती. नंतर मात्र हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. ही ट्रेन पुन्हा सुरू झाल्यास देशभरात सर्व भागात कमी वेळात कमी खर्चात कांद्यासारखा शेतमाल पोहोचू शकेल व त्याचा शेतकरी, व्यापारी व ग्राहक अशा तिन्ही घटकांना लाभ होईल. या शिवाय रेल्वे वॅगन या अत्यंत कमी प्रमाणात व जास्तीच्या दरात उपलब्ध होत असल्याने शेतमालाचा बाजारात निपटारा होण्यात अडचणी येतात. याबाबतीतही केंद्र शासन, राज्य शासन व रेल्वे मंत्रालयाने मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांमधून होत आहे. साठवणक्षमतेने वाढविले प्रश्‍न... पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे संचालक अतुल शाह म्हणाले, की मागील पाच ते सात वर्षांत शेतकरी व व्यापारी या दोन्ही घटकांकडे साठवणक्षमता वाढली आहे. यामुळे योग्य दर मिळेपर्यंत कांदा थांबविण्याची सोय झाली आहे. मात्र, लागवड, उत्पादन, बाजार स्थिती याची नेमकी व अद्ययावत माहिती होत नसल्याने बहुतांश वेळा एकाच वेळी आवक जास्त होते व त्यात सर्वच घटकांचे नुकसान होते. देशांतर्गत बाजारात बंपर उत्पादन झाल्यामुळे निर्यातीला होणारा उठावही कमी झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT