ravikant_tupkar
ravikant_tupkar  
मुख्य बातम्या

हजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय` चौकशी कधी करणार?

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्यात काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगने आत्महत्या केल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. मात्र, मागील पाच दशकात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची सीबीआय चौकशी कधी होणार, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शासनकर्त्यांना केला आहे. त्यांनी समाज माध्यमातून उपस्थित केलेल्या या प्रश्‍नांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.  ‘‘राज्यात सुशांतसिंग प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या प्रकरणात तुपकर यांनी उडी घेत शासनकर्त्यांना शेतकरी आत्महत्यांबाबत गांभीर्य कधी दाखवणार असे विचारले आहे.  गेल्या पाच दशकात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनकर्त्यांनी विविध पॅकेज देऊन या महत्त्वाच्या प्रश्‍नाला झुलते ठेवले. परंतु अद्यापही कुठल्याही शासनकर्त्यांना आत्महत्या थांबवता आलेल्या नाहीत. कधीही शासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. चित्रपट अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणाला जितक्या गांभीर्याने शासनाने प्राधान्य दिले तेवढीच गंभीरता, न्याय शेतकऱ्यांबाबत का लावल्या जात नाही. आजवर हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्या. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,’’ असेही तुपकर यांचे म्हणणे आहे.

राज्यपाल शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता दाखवणार का ? दरम्यान तुपकर यांनी अभिनेत्री कंगना रानावतने राज्यपालांची भेट घेतल्या प्रकरणीसुद्धा राज्यपालांनाही प्रश्‍न विचारला आहे. एवढी तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दाखवणार का?, असे त्यांनी म्हटले आहे. समाज माध्यमातून उपस्थित केलेल्या या प्रश्‍नांवरही सर्वदूर प्रतिक्रिया येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT