विंग विभागातील विहीरी फुल्ल
विंग विभागातील विहीरी फुल्ल 
मुख्य बातम्या

विंगसह विभागातील विहिरी अक्षरशः फुल्ल

सकाळ वृत्तसेवा

विंग, जि. सातारा : यंदा नियमित पावसामुळे विंगसह विभागातील विहिरी अक्षरशः फुल्ल झाल्या आहेत. काठावरूनच पाणी घेताना शेतकरी ठिकठिकाणी दिसत आहेत. गत दहा वर्षांत याउलट चित्र परिसरात होते. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी टिकेल की नाही, असा भरवसा नव्हता. यंदा मात्र पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. 

मागील दहा वर्षांनंतर कधी नव्हे एवढा पाऊस यावेळी विंगसह विभागात झाला आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली. खरिपाचे नुकसान झाले असले तरी ओढे, नाले मात्र खळखळून वाहिले. अद्यापही सर्रास प्रवाह सुरूच आहेत. विहिरीदेखील तुडुंब झाल्या आहेत. त्यानंतर गत आठवड्यात परतीच्या पावसाने परिसरात दणका दिला आहे. दोन दिवस उघडीप असली तरी शिवारातही मुबलक पाणी आहे. शेतात पाणी साचून राहिले आहे. शेतातून वाहतानाही दिसत आहे. नुकसानीच्या भीतीने अनेकांनी पाणीउपसा पंप काढून ठेवले आहेत. त्यामुळे विहिरी अक्षरशः काठोकाठ झाल्या आहेत. पिण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी काठावरूच पाणी घेताना ठिकठिकाणचे चित्र आहे.

गत दहा वर्षांत मात्र परिसरात उलट चित्र होते. पावसाची अनियमितता होती. त्यामुळे या दिवसातही शेतीपंप सुरू असायचे. त्यामुळे मार्च-एप्रिलनंतर पाणीसाठा पुढे टिकेल सांगता येत नव्हते. सध्यातरी विहिरी तुडुंब आहेत. ओढ्याचे प्रवाह वेगाने सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीपाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा नाही, या आशेवर शेतकरी  आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT