पावसात आठवडाभर खंड
पावसात आठवडाभर खंड 
मुख्य बातम्या

पावसात आठवडाभर खंड

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसाने दमदार हजेरी लावली. राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्याने पावसाने उघडीप दिली आहे. आठवडाभर पावसात खंड पडण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता.१६) तळकोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता.१४) मराठवाड्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाचा जोर मंदावला होता, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दोडामार्ग, वेंगुर्ला, राजापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. तर पूर्व विदर्भातील मुलचेरा, चामोर्शीसह काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुलचेरा येथे उच्चांकी १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  अरबी समुद्रावरील ढगांचे आच्छादन कमी झाले असून, राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने तळकोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्य आहे. आज (बुधवारी) किनाऱ्यालगत तशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.  

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये - स्राेत हवामान विभाग) : 

  • कोकण : दोडमार्ग, वेंगुर्ला, राजापूर, कुडाळ प्रत्येकी ३०, सावंतवाडी, मुलदे, देवगड प्रत्येकी २०. कणकवली, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी १०. 
  • मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर, राधानगरी प्रत्येकी २०, चंदगड, लोणावळा प्रत्येकी १०. 
  • मराठवाडा : चाकूर ८०, माहूर ५०, किनवट १०. 
  • विदर्भ : मुलचेरा १३०, चामोर्शी ११०, देसाईगंज ९०, रामटेक, गोंडपिंपरी प्रत्येकी ८०, अहेरी ७०, सडक अर्जुनी, मूल, साकोली प्रत्येकी ५०, अर्जुनी मोरगाव, तिरोरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, पोंभुर्णा, दर्यापूर प्रत्येकी ४०, पारशिवणी, अरमोरी, धानोरी, गडचिरोली, लाखनी, लाखंदूर प्रत्यकी ३०, उमरेर, भंडारा, नागभिर, सिंदेवाही, साकोली, चंद्रपूर, पवनी, तुमसर, मोहाडी प्रत्येकी २०.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT