किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ
किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ 
मुख्य बातम्या

किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : मालदिवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागावर झाला असून, पहाटे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटे असलेल्या थंडीची तीव्रताही कमी झाली असून, गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दक्षिणेकडे असलेला सूर्य उत्तरेकडे सरकू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या काही भागात ढगाळ हवामान होते. रविवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंत गोदिया येथे 9.7 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. येत्या शुक्रवार (ता. 18) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता. 20) पर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली. भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी वाढ होऊन किमान तापमान 19.0 अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशांनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढले असून, किमान तापमानाचा पारा 14.3 अंश सेल्सिअसवर होता. मराठवाड्यातील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढ झाली आहे. नांदेडमध्ये 13.5 अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील बहुतांशी भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली. गोंदियापाठोपाठ नागपूर व चंद्रपूर येथे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

रविवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 21.8 (5), अलिबाग 21.4 (4), रत्नागिरी 21.8 (3), भिरा 19.0 (3), डहाणू 21.3 (4), पुणे 15.6 (5), जळगाव 15.2 (3), कोल्हापूर 20.1 (5), महाबळेश्वर 16.8 (4), मालेगाव 18.2 (7), नाशिक 14.3 (4), सांगली 17.9 (4), सातारा 16.6 (4), सोलापूर 18.9 (3), औरंगाबाद 15.4 (4), परभणी शहर 14.5, नांदेड 13.5, अकोला 17.5 (3), अमरावती 16.8(2), बुलडाणा 18.2 (4), चंद्रपूर 13.2 (-2), गोंदिया 9.7 (-4), नागपूर 13.0, वर्धा 15.5 (2), यवतमाळ 18.0 (3)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT