उत्तर महाराष्ट्रात आजपासून धुके
उत्तर महाराष्ट्रात आजपासून धुके 
मुख्य बातम्या

उत्तर महाराष्ट्रात आजपासून धुके

टीम अॅग्रोवन

पुणे : जमिनीत पुरेसा ओलावा असून दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश पडत आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) आणि उद्या (ता. 13) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी धुके पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढू लागली आहे. सोमवारी (ता.11) सकाळी आठ वाजेपर्यत गोंदिया येथे 10.4 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. तसेच उत्तर भारतातील जम्मू आणि काश्‍मीर, हरियाना या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थितीची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी, राज्यातील कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेली थंडी हळूहळू परतू लागली आहे. सोमवारी (ता.11) विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशाने घट झाली असल्याचे चित्र होते.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या दक्षिणेकडून वारे वाहत आहे. कोकणातील रत्नागिरीतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशाने वाढ झाली असून वीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. अलिबाग येथे 21.4 किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशाने वाढ होऊन 15.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. नगरमध्ये 13.5 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान होते. सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घट झाली आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये 13.8 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान होते.

सोमवारी (ता.11) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  मुंबई (सांताक्रुझ) 21.2 (2), अलिबाग 21.4 (3), रत्नागिरी 20.0 (6), डहाणू 21.4 (3), भिरा 20.0 (2), नगर 13.5 (1), पुणे 15.1 (4), जळगाव 15.0 (3), कोल्हापूर 18.3 (3), महाबळेश्वर 14.6 (1), मालेगाव 16.0 (5), नाशिक 14.0 (3), सांगली 16.4 (2), सातारा 15.0 (1), सोलापूर 13.4(-2), औरंगाबाद 14.2 (3), बीड 13.8 (1),परभणी 15.1 (4), नांदेड 16.0 (3), अकोला 13.0 (-1), अमरावती 12.2(-3), बुलढाणा 14.6, चंद्रपूर 13.8, गोंदिया 10.4(-3), नागपूर 10.7 (-2), वर्धा 11.5 (-3), यवतमाळ 13.0 (-2)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT