संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

किमान तापमानात हळूहळू वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात किंचित थंडी असून मराठवाडा व विदर्भात काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी ७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवामान कोरडे असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकणातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले आहे. या भागात किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान असून थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा काही प्रमाणात जोर कायम असून किमान तापमान सरासरीएवढे आहे. तर कोल्हापूर, महाबळेश्वर येथे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकाच्या उत्तर भागादरम्यान समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून थंडीत चढउतार सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांपर्यत वाढला आहे. मराठवाड्यात किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानाबरोबर दिवसाच्या कमाल तापमानातही आता वाढ होऊ लागली आहे. येत्या शुक्रवार (ता.१८) पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून किमान तापमान कमी - अधिक होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सोमवारी (ता.१४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रुझ) १५.१ (-२),  रत्नागिरी १६.५ (-२), डहाणू १६.० (-१), नगर ९.२ (-३), पुणे १०.७ (-१), जळगाव १०.४ (-१), कोल्हापूर १६.९ (२), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १२.२ (१), नाशिक १०.६ (१), निफाड ७.८, सांगली १२.९, सातारा १२.९, सोलापूर १५.० (-१), औरंगाबाद १३.५ (२), बीड १४.४ (१), परभणी १४.८ (१), उस्मानाबाद १४.१, नांदेड १५.५ (२), अकोला १३.३ (-१), अमरावती १५.२ (१), बुलढाणा १३.६(-१), चंद्रपूर १५.२, गोंदिया १२.५ (-१), नागपूर १५.५ (२), वर्धा १६.९ (३), यवतमाळ १५.८ (१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT