चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमान
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमान 
मुख्य बातम्या

चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमान

टीम अॅग्रोवन

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन वाढतच आहे. उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अक्षरश: भाजून निघाला आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जगातील सर्वांत उष्ण ठिकाणांमध्ये चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर हाेते. तर पहिल्या दहा ठिकाणांमध्ये चंद्रपूरसह विदर्भातील गोंदिया, अकोला, वर्धा, मराठवाड्यातील परभणीचा समावेश असल्याचे अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे.  मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. २७ मार्च रोजी भिरा येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर यथे ४५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत हंगामातील उच्चांक नोंदला गेला. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४२ अशांच्या पुढे गेले आहे. अकोला, गेंदिया, वर्धामध्ये पारा ४४ अंशांवर गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, परभणी, बीड येथे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.  कोकणात तापमान ३३ ते ३५ अंशांच्या असपास आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी ३७ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. राज्यात सध्या मुख्यत: कोरडे हवामान आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मंगळवारी (ता. २४) विदर्भ मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे.  शुक्रवारी (ता.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.७, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.२, सांगली ४०.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.२, मुंबई (सांतक्रूझ) ३५.२, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३५.९, आैरंगाबाद ४०.१, परभणी ४३.८, अकोला ४४.०, अमरावती ४३.०, बुलडाणा ४१.०, चंद्रपूर ४५.३, गोंदिया ४४.४, नागपूर ४२.२, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT