उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशीपार
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशीपार 
मुख्य बातम्या

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशीपार

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १७) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सायंकाळी ढगाळ हवामान होत असले तरी दुपारपर्यंत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. मालेगावसह जळगाव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४० अंशांवर पोचले आहे. पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून नैर्ऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दोन दिवस पावसाची शक्यता आहे.  रविवार (ता.१५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३३.२, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.६, सांगली ३८.४, सातारा ३८.४, सोलापूर ३९.८, मुंबई ३२.५, अलिबाग ३१.५, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ३९.०, परभणी ४१.७, नांदेड ४०.०, अकोला ४१.५, अमरावती ४०.८, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४०.३, गोंदिया ३७.६, नागपूर ३९.७, वर्धा ४०.५, यवतमाळ ४०.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT