राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार
राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार 
मुख्य बातम्या

राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्यात वाढलेले उन्हाचा ताप सोमवारपर्यंत (ता. २) कायम राहणार आहे. मराठवाड्यात शनिवारी (ता. ३१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अकोला येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा ताप वाढला आहे. तर राज्याच्या सर्वच भागात दिवस रात्रीच्या तापमानात तफावत टिकून आहे. सोमवारपर्यंत राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने शनिवारी (ता. ३१) मराठवाड्यात ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  शुक्रवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४१.०, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.०, नाशिक ३०.६, सांगली ३७.०, सातारा ३८.७, सोलापूर ४१.६, मुंबई ३२.०, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३३.२, आैरंगाबाद ३९.४, परभणी ४१.९, नांदेड ४२.०, अकोला ४२.५, अमरावती ४१.०, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.२, नागपूर ४०.९, वर्धा ४१.९, यवतमाळ ४१.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT