उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळला
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळला 
मुख्य बातम्या

उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळला

टीम अॅग्रोवन

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट, वादळ, पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी दाणादाण उडवून दिली अाहे. तर तीव्र उन्हांच्या झळांनी विदर्भ होरपळून गेला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २०) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जागतिक तापमानाचा विचार करता सौदी अरेबियाच्या ‘शरुराह’ हे पहिल्या क्रमांकाचे उष्ण ठिकाण ठरले अाहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये शरुराह येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पहिल्या दहा उष्ण ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, अकोला, वर्धा ही ठिकाणे असल्याचे ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४१ अंशांच्या वर गेले असून, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, नाशिक, सोलापूर येथे तापमान ४० अशांपार गेले आहे. राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  बुधवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, नगर ४२.१, कोल्हापूर ३८.०९, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.०, नाशिक ४०.२, सातारा ३९.१, सांगली ३८.५, सोलापूर ४१.०, मुंबई ३४.२, अलिबाग ३३.७, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३५.१, आैरंगाबाद ४०.०, परभणी ४२.०, अकोला ४४.१, अमरावती ४३.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.०, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४०.८, नागपूर ४३.२, वर्धा ४४.०, यवतमाळ ४२.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT