पारा आणखी खालावला...
पारा आणखी खालावला... 
मुख्य बातम्या

पारा आणखी खालावला...

टीम अॅग्रोवन

पुणे ः मॉन्सून परतल्यानंतर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात बहुतांश भागांतील हवामान काेरडे झाले आहे. परिणामी, राज्यातील थंडी वाढत असून, शनिवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे सर्वांत कमी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. तर सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद भिरा येथे झाली.  पुढील चार दिवस बुधवार (ता. १) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे. गेल्या २४ तासांत काेकण गाेवा मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर मध्य महाराष्ट्रच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली.  शनिवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले कमाल आणि किमान (कंसात) तापमान ः (अंश सेल्सिअस)  मुंबई ३४.४ (२५.५), अलिबाग ३४.१ (२३.६), रत्नागिरी ३३ (२३.७), पणजी ३२.९ (२४.२), डहाणू ३३.८ (२२), भिरा ३५.५ (२१) पुणे ३१.१ (१९) नगर ३२.६ (१४.५), काेल्हापूर ३०.३ (२२.८), महाबळेश्‍वर २२.८ (१५.६), मालेगाव ३४ (१७.६), नाशिक ३२.४ (१४.२), सांगली ३१.४ (२२.१), सातारा ३२.६ (२०.९), साेलापूर ३३.९ (२०.५), आैरंगाबाद ३३.६ (१६.६), परभणी ३३.५ (१८.१), नांदेड ३३.५ (२१), अकाेला ३४.९ (१६.९), अमरावती ३१.८ (१७.२), बुलडाणा ३२ (१७.७), ब्रह्मपुरी ३३.८(१८.३), चंद्रपूर ३४ (२०.६), नागपूर ३३.८ (१७.८), वर्धा ३३.५ (१६.५), यवतमाळ ३३ (१५.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT