आकाश निरभ्र होणार; थंडीतही वाढ अपेक्षित
आकाश निरभ्र होणार; थंडीतही वाढ अपेक्षित 
मुख्य बातम्या

आकाश निरभ्र होणार; थंडीतही वाढ अपेक्षित

टीम अॅग्रोवन

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले चक्राकार वारे आणि अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांची तीव्रता कमी झाली आहे. आजपासून (ता. १४) राज्यात आकाश निरभ्र राहणार असून, थंडीत किंचित वाढ होईल. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.    मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील नगर, सोलापूरचा काही भाग, मराठवाडा व विदर्भात मंगळवारी (ता. १३) ढगाळ हवामान होते. मराठवाड्यातील बुलडाणा व चिखली तालुक्यांतील काही भागांत गारपीट झाली. तसेच उदगीर येथे तीन मिलिमीटर एवढा हलका पाऊस पडला. तर चंद्रपूरमध्ये तीन, ब्रह्मपुरी दोन, यवतमाळ एक मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. परिणामी किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांपर्यंत वाढ झाली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात आकाश निरभ्र आहे. त्यामुळे थंडीत किंचित वाढ झाली आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, भिरा, डहाणू येथील किमान तामपानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन अंंशांनी खाली घसरला आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, नाशिक, नगर, निफाड भागांत आकाश निरभ्र असल्याने किंचित थंडी आहे. पुणे, नगर, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर भागांत थंडी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वातावरणात उकाडा वाढला असून, काही भागांत मराठवाड्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा पंधरा अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे थंडी गायब झाली आहे. अमरावती, यवतमाळ येथील किमान तामपानात किंचित घट झाली आहे.  मंगळवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.८ (-२), अलिबाग १७.२ (-१), रत्नागिरी १८.७ (-१), भिरा १४.० (-२), डहाणू १६.७ (-१), पुणे ११.२, नगर १३.४, जळगाव १५.६ (२), कोल्हापूर १७.९ (२), महाबळेश्वर १३.० (-१), मालेगाव १३.२ (१), नाशिक १०.६ (-१), निफाड ८.४, सांगली १७.६ (३), सातारा १४.१, सोलापूर १९.७ (२), औरंगाबाद १७.० (४), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १६.०, परभणी शहर १५.५ (-१), नांदेड १८.० (३), उस्मानाबाद १३.४, अकोला १९.३(३),  अमरावती १६.० (-१), बुलडाणा १६.७ (१), चंद्रपूर १७.०, गोंदिया १६.२ (१), नागपूर १६.६ (१), वर्धा १६.४ (२), यवतमाळ १६.० (-१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT