हवामान अंदाज
हवामान अंदाज 
मुख्य बातम्या

नागपूर ३६.४ अंशांवर

sandeep navale

पुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंत विदर्भातील नागपूर येथे ३६.४ अंश सेल्सिअस एवढी कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात सकाळपासून ऊन व सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हवामानात सकाळपासून चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी, कमाल तापमानातही वाढ झाली. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडले होते.

काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ हवामान होते. त्यामुळे या भागातही चांगलाच उकाडा होता. राज्यातील बहुतांशी भागातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली; तर किमान तापमानात घट झाली असून, औरंगाबाद येथे १२.४ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

परतीचा पाऊस गेल्यामुळे काही भागांत हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान असून, मंगळवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाडा व विदर्भात कडक ऊन पडले होते.

उकाडा वाढणार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हवामानात उकाडा वाढून पुन्हा कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT