राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस
राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस 
मुख्य बातम्या

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

sandeep navale

पुणे : सध्या राज्यातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाले आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येत्या शुक्रवार (ता. 13) पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज (बुधवारी) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शनिवार (ता.14) पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सध्या राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 32 अंशापर्यंत खाली आला आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत असून काही भागात उकाडा वाढला आहे. मंगळवारी ( ता. 10) मध्य महाराष्ट्रातील नेवासा, पुणे, मराठवाड्यातील सोयगाव, बनोटी येथे जोरदार पाऊस पडला. कोकणात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. मंगळवारी सकाळीपर्यंत कोकणातील म्हापसा, म्हसळा, कानकोन, दापोली, मुरबाड अशा काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला. तसेच वाणगाव, भिवपुरी, खंद या घाटमाथ्यावरही हलका पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील पाथर्डी येथे सर्वाधिक 50 मिलिमीटर पाऊस पडला. तर नेवासा, आंबेगाव, घोडेगाव, सुरगाणा, बार्शी येथेही जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील घनसांगवी, मुदखेड, वसमत येथे 70 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उर्वरित अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भातील मंगळूरपीर येथे 90 मिलिमीटर पाऊस पडला. तर बाभूळगाव, हिंगा, अकोट, अमरावती, बाळापूर, चिखली येथेही जोरदार पाऊस पडला. मंगळवारी (ता.10) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) कोकण ः म्हापसा 50, म्हसळा 40, कानकोन, दापोली, मुरबाड 30, कर्जत 20, लांजा, महाड, मुंबई, पेरनेम, उरण, वैभववाडी 10 मध्य महाराष्ट्र ः पाथर्डी 60, नेवासा 50, आंबेगाव, घोडेगाव, सुरगाणा 40, बार्शी, दिंडोरी, गगनबावडा, जुन्नर, ओझर, पंढरपूर, फलटण, शेवगाव, सोलापूर 30 चांदवड, जामखेड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर 20, अकोले, धरणगाव, इगतपुरी, कळवण, माढा, महाबळेश्वर, माळशिरस, पेठ, श्रीगोंदा, येवला 10 मराठवाडा ः घनसांगवी, मुदखेड, वसमत 70, अहमदपूर, औढानागनाथ, परभणी 60, औरंगाबाद 50, नायगाव, खैरगाव, उदगीर, उमरी 40, कळंब, खुल्ताबाद, लोहा, माजलगाव, शिरूरअनंतपाल, सोनपेठ 30 विदर्भ ः मंगळूरपीर 90, बाभूळगाव 80, हिंगा 60, अकोट, अमरावती, बाळापूर, चिखली, करंजालाड, खामगाव, परतूर, तिरोरा 50, धानोरा, लाखंदूर, मोताळा, मूर्तिजापूर 40, बार्शी, बुलडाणा, चांदूर, दारव्हा, कुही, मलकापूर, पुसद 30, अहिरी, अकोला, अरणी, आष्टी, बत्कुली, भद्रावती, भामरागड, भिवपूर, चांदूरबाजार, देऊळगाव राजा, कुरखेडा, लाखनी, महागाव, नागपूर, नांदूर, पाटवाडा, राजूरा, साकोली, सिंधखेडराजा, तुमसर, उमरखेड 20

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT