तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

गणेश कोरे

पुणे : काेकणातील दक्षिण भागासह गाेवा, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात साेमवारी (ता. २) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या २४ तासांत काेकण गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर काेकण गाेव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर मराठवाड्यात हवामान काेरडे हाेते. पुढील चार दिवसांत बुधवार (ता. ४) आणि गुरुवार (ता. ५) गाेव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवार (ता. १)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) काेकण गाेवा - पेण ७०, फाेंडा ४०, वैभववाडी ३०,

मध्य महाराष्ट्र - शिराेळ ३०, इगतपुरी मिरज, पन्हाळा २०

विदर्भ - देवरी १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT