राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस, गारपिटीचाही अंदाज
राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस, गारपिटीचाही अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस, गारपिटीचाही अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्नाटक, अरबी समुद्र ते मालदीव या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, आजपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागांत मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कोकणात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच, उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर पाकिस्तान, हिमालय या भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पंजाब व हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.

गेले दोन दिवस आकाश निरभ्र होते. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १३) राज्यात ढगाळ हवामान राहणार असून, रविवारी (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. १२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल, तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल. मंगळवारी (ता. १३) मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली वाढ-घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १६.७ (-१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १९.७ (-१), भिरा १४.५ (-१), डहाणू १८.५ (१), पुणे १०.८ (-१), नगर १०.६ (-३), जळगाव १२.२ (-१), कोल्हापूर १८.५ (३), महाबळेश्वर १३.६, मालेगाव १२.५ (१), नाशिक ९.२ (-१), निफाड ८.०, सांगली १७.७ (३), सातारा १३.७, सोलापूर १७.८, औरंगाबाद १३.५ (१), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १२.०, परभणी शहर १४.० (-२), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १३.४, अकोला १६.०, अमरावती १६.२, बुलडाणा १६.५ (१), चंद्रपूर १५.४ (-१), गोंदिया १५.२, नागपूर १५.६, वर्धा १६.५ (२), यवतमाळ १७.० (१) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT