थंडीत चढ-उताराची शक्यता
थंडीत चढ-उताराची शक्यता 
मुख्य बातम्या

थंडीत चढ-उताराची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्याचा प्रवाह कमी होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात थंडी किंचित कमी होऊन परत किंचित वाढेल. सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. मात्र, जसजसे आकाश निरभ्र होईल, तसतसे थंडीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  श्रीलंकेजवळ ढग दाटून आले आहेत. तसेच, त्याखाली हिंदी महासागरात एक चक्राकार वाऱ्याचे रूप धारण करत आहे. परंतु, त्याची तीव्रता अधिक नसेल. उत्तर ऑस्ट्रेलिया व फिलिपिन्स देशाजवळ जी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे, ती भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम करेल. ते चक्रीवादळ पाण्याची वाफ व ढग आपल्याकडे खेचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढेल. सध्या महाराष्ट्रावर पाण्याची वाफ कमी असल्याने थंडी जास्त आहे. या परिस्थितीत कर्नाटकाचा उत्तर भाग व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे काही प्रमाणात वातावरण थोडेसे ढगाळ होऊन थंडी कमी होईल. मागील आठवड्यामध्ये हिमालयात बर्फवृष्टी होत होती. वाऱ्याचा वेग हिमालयाकडून महाराष्ट्रावरील भागाकडे होता. त्यामुळे हिमालयातील वारे महाराष्ट्रावर येताना थंडी वाहून आणत होते. येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलत असून, ती येत्या काही दिवसांत नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरवात होईल. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.० (-२), अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.३ (-२), भिरा १४.५ (-१), डहाणू १४.८ (-२), पुणे ११.१, जळगाव ८.४ (-४), कोल्हापूर १७.१ (-१), महाबळेश्वर १३.६, मालेगाव ११.८ (१), नाशिक ९.७ (-१), निफाड ९.४, सांगली १४.२, सातारा १२.४ (-१), सोलापूर १४.७ (-२), औरंगाबाद ११.० (-१), परभणी शहर १०.० (-५), नांदेड १२.० (-२), उस्मानाबाद ९.९, अकोला ११.६ (-३), अमरावती १४.२ (-१), बुलडाणा १३.४ (-२), चंद्रपूर १२.० (-३), गोंदिया ८.६ (-६), नागपूर ८.५ (-६), वर्धा १०.९ (-३), यवतमाळ १२.० (-४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT