परतूर, जि. जालना : परतूरसह परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडले आहेत. टरबूज तयार आहेत पण विकायचे कुठे ? हा मोठा प्रश्न सध्या या शेतकऱ्यांना पडला आहे.
परतूर येथे दुधना नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड होत असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड करण्यात आली.
अनेक अस्मानी संकटाचा सामना करत कशीबशी टरबुजाची बाग जगली. पण अचानक आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पूर्ण भारतात २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सध्या पूर्ण फळांच्या अडती बंद पडल्या आहेत. व्यापारी पण टरबूज घेण्यास नकार देत आहे. अशा परिस्तिथीत माल विकायचा कुठं असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. यावर काही तरी पर्याय काढावा, अशी मागणी टरबूज उत्पादक करीत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.