dam water
dam water  
मुख्य बातम्या

काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

टीम अॅग्रोवन

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत असमतोल स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मात्र, काही भागांत अधिक प्रमाणात पाऊस झाला. प्रामुख्याने या विभागातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात गेल्या १५ दिवसांत चांगली वाढ होत आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. या विभागात काटेपूर्णा, वान, खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी हे मोठे प्रकल्प आहेत. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला व ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा प्रकल्प सध्या ४६ टक्के भरला आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता. मात्र, पिण्यासह सिंचनासाठी पाण्याचा वापर केल्याने जूनमध्ये या प्रकल्पात १.१४ टीएमसी साठा शिल्लक होता. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णातील साठा वेगाने वाढला. आता या प्रकल्पात सुमारे १.४० टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील साठ्यातही जूनच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पात ०.५४ टीएमसी साठा होता. सध्या हा साठा १.०५ टीएमटी झाला आहे. यासोबतच पेनटाकळी प्रकल्पातील पाणी साठासुद्धा वाढला आहे. १४ जूनला या प्रकल्पात ०.८६ टीएमसी साठा होता. ७ जुलैला हा साठा १.०५ टीएमसी म्हणजेच ४७.७९ टक्के इतका झाला आहे. वान या मोठ्या प्रकल्पातील पाणी साठा वाढलेला नाही. १४ जूनला या प्रकल्पात १.२४ टीएमसी साठा होता. सध्या तो १.१२ टीएमसी आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

प्रकल्पांतील साठा (टीएमसीत)

प्रकल्प   क्षमता साठा टक्केवारी
काटेपूर्णा   ३.०४ १.४०    ४६.०६ 
वान    २.८९   १.१२   ३८.९५ 
खडकपूर्णा  ३.२९      १.०५  ३२.०१
नळगंगा  २.४४  १.२३   ५०.५१
पेनटाकळी  २.११   १.०५  ४७.७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT