वऱ्हाडातील पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढ
वऱ्हाडातील पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढ 
मुख्य बातम्या

वऱ्हाडातील पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढ

टीम अॅग्रोवन

अकोला : एकीकडे कडाक्याची थंडी सर्वत्र पसरलेली असली तरी पाणीटंचाईची तीव्रताही वाढत चालली आहे. वऱ्हाडात या हंगामात अनियमित पाऊस झाल्याने त्याचा फटका बसला अाहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठा करावयाच्या गावांची संख्या वाढत आहे.

अकोला जिल्ह्यात तेल्हारा, बार्शीटाकळी तालुक्यांत पाणीटंचाईची झळ अधिक बसत आहे. यामुळे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना म्हणून कूपनलिका, विंधन विहिरींच्या कामांना मंजुरात देण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यात माळेगाव बाजार, निंभोरा खुर्द, निंभोरा बुद्रुक, सदरपूर, जाफरापूर, तुदगाव, तळेगाव डवला, बोरव्हा, कोठा या ठिकाणी कूपनलिका मंजूर करण्यात आल्या. बार्शिटाकळी तालुक्यात उजळेश्वर, घोटा, विझोरा, रेडवा, पुनोती खुर्द, कान्हेरी सरप या ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. याशिवाय बाळापूर तालुक्यात बारलिंगा गावात एक विंधन विहीर मंजूर केली आहे. ही कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

बुलडाण्यात टँकर वाढले कमी पावसाची सर्वाधिक झळ बुलडाणा जिल्हा सोसत अाहे. या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे असून पाणी पातळीतही घट झाली. यामुळे गेले वर्षभर विविध गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यात २६ गावांमध्ये २५ टँकर धावत आहेत. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात २१ टँकर धावत होते. एका आठवड्यात चार टँकर वाढले. अद्यापही असंख्य गावांमधून टँकरची मागणी येत आहे. तसे प्रस्ताव तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये दाखल होतआहेत. जानेवारीमध्येच पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. अद्याप सात महिने शिल्लक असून जिल्ह्यातील टँकरची मागणी लवकरच १०० पर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT