पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळ
पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळ 
मुख्य बातम्या

पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळ

टीम अॅग्रोवन

भंडारा ः उन्हाच्या झळांसोबतच पाणीटंचाईचे संकटही अनेक गावांमध्ये नजीकच्या काळात गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने १५५५ कामे सुचविली होती. त्यातील केवळ ५७२ उपाययोजनांवर काम सुरू आहे. भूजल विकास आणि सर्वेक्षण यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात दोन ते तीन टप्प्यांत पाणीटंचाई उपाययोजना शिफारशीत आहेत. त्यामध्ये २७५ गावांत विहीर खोलीकरण, तसेच अनेक ठिकाणी गाळउपसाची ४३१ कामे, तसेच नळ योजनांची दुरुस्ती, ११२ गावांत ११७ कामे विंधनविहिरींची विशेष दुरुस्ती, कूपनलिकांची ५१ गावांत ६१ कामे अशी एकूण ६७९ गावांत १५५५ कामे प्रस्तावित आहेत. 

त्यातील केवळ ५७२ उपाययोजना सुरू असून, दुसऱ्या टप्प्यातील अनेक कामे रेंगाळली आहेत. आचारसंहितेचे कारणाआड ती रखडत ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या या धोरणाविषयी ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. पाणीटंचाई निवारण ही आवश्‍यक बाब असल्याने निदान अशा बाबींना तरी आचारसंहितेतून वगळावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे. 

विशेष म्हणजे भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु दरवर्षी घटत्या पर्जन्यमानामुळे तलाव पूर्णस्थितीत भरत नसल्याने पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत दुसऱ्या टप्प्यात ४०५ गावांतील ४५३ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. यामध्ये ६५ गावांत ८१ नवीन विंधन विहिरी, १६ गावांत नळयोजनांची विशेष दुरुस्ती, तीन गावांत चार विहिरींचे खोलीकरण तसेच १५७ गावांत ३३२ विंधन विहिरींची विशेष दुरुस्तींच्या कामांचा समावेश आहे. त्यानंतर एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात २७४ गावांत ५२६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये ५४ गावांत ११४ विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती समावेशित आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT