पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या
पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या 
मुख्य बातम्या

पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या

टीम अॅग्रोवन

पुणे : विभागात टंचाईच्या झळांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ६४ गावे ४४७ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई भासत आहे. या टंचाईग्रस्त भागातील सुमारे १ लाख २० हजार लोकसंख्या आणि १४ हजार पशुधनासाठी ६५ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पुणे आणि सातारा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासूनच टंचाई भासू लागली होती. त्यापाठोपाठ आता सांगली आणि सोलापूरलाही टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. भूजलाची पातळी खालावू लागल्याने विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही आटल्याने माणसांबरोबरच जनावरांनाही टंचाईच्या झळा बसत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५३ हजार, साताऱ्यातील ४९ हजार, सांगलीतील १३ हजार आणि सोलापुरातील सुमारे ४ हजार लोकसंख्येला आणि सातारा सोलापुरातील १३ हजार ९२१ जनावरांना टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे.

यंदा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून, ३८ गावे १९५ वाड्यांना ३४ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. यात माण तालुक्याच्या सर्वाधिक २९ गावे १८५ वाड्यांतील २६ टॅंकरचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील १७ गावे १९१ वाड्यांमध्ये २३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सांगलीतील ६ गावे ३२ वाड्यांना ५ टॅंकरने तर सोलापूरच्या माढा तालुक्यातील ३ गावे २९ वाड्यांना ३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप टंचाई भासत नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या पुणे    बारामती १०, शिरूर ८, पुरंदर २, जुन्नर २, दौंड १. सातारा    माण २६, खटाव ५, फलटण २, कोरेगाव १. सांगली    खानापूर ३, आटपाडी २. सोलापूर    माढा ३.

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती  
तालुके गावे वाड्या टॅंकर
पुणे १७ १९१ २३
सातारा ३८ ११५ ३४
सांगली ३२
सोलापूर २९
एकूण ६४ ४४७ ६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT